...म्हणून सोलापूरातील इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सोलापुरातील इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केली.

सोलापूर: फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सोलापुरातील इंजीनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. मनिष विजयराज बंकापुर (वय 23) असे अटक तरुणाचे नाव आहे.

मनिष सध्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

SVS Aqua कंपनीत मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे आली समोर...

दरम्यान, सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संबंधिताला पहिल्या दोषसिध्दीस पाच वर्षाची कैद तर दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. तर दुसऱ्यांदा दोषारोप सिध्द झाल्यास त्याला सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. अशा बाबींवर सायबर क्राईमचा वॉच असून संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. 

प्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

सोलापुरातील तरूणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती.

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरुणाची खात्री केली. त्याच्या मोबाईलचा 'आयपी' ड्रेसचा शोध घेऊन त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Solapur engineering student arrested for posting child porno
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे