करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाळू माफियांची पळापळ...

वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. कोणी अवैध वाळू उपसा वाहतूक अथवा अवैद्य धंदे करत असल्यास करमाळा पोलिस स्टेशनची संपर्क साधावा.

सोलापूर: करमाळा पोलिसांनी वाळू माफियांविरोधात केलेल्या कारवाईत 23 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

बापरे! सिनेस्टाईलने 3 ट्रक ताब्यात; आत पाहिल्यावर बसला धक्का...

मंगळवारी (ता. 1) पहाटे दोनच्या सुमारास मौजे सांगवी नंबर एक येथे भीमा नदीचे पात्राचे कडेला अवैध वाळू वाहतूक करीत असले गोपनीय माहिती माहितीद्वारा मार्फत मिळाली व लगेचच माननीय पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त पोलिस अधीक्षक  अतुल जी झेंडे, करमाळा चे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल जी हिरे यांचे मार्गदर्शनाखाली व करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत जी कोकणे यांचे आदेशाने जेऊर दूर क्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल आनंद पवार, पोलिस कॉन्स्टेबल गुघे, पोलिस कॉन्स्टेबल कांबळे, पोलिस नाईक मराळे यांचे टीमने कारवाई केली.

Video: पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलला भीषण आग...

त्यात पुढील प्रकारचा मुद्देमाल १) श्री एक्स कंपनी चा जेसीबी किंमत 800,000/ लाख रुपये २) स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व दोन चाकी डंपिंग टेलर 1 ब्रास वाळू किंमत 5,10,000 / ३) 1 स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर दोन चाकी डंपिंग टेलर 1 ब्रास वाळू किंमत 5,10,000/ ४) एक न्यू हॉलांड कंपनीचा ट्रॅक्टर एक दोन चाकी डम्पिंग टेलर व 1 ब्रास वाळू किंमत 5,10,000/ एकूण मुद्देमाल किंमत रुपये) 23,30,000/असा मुद्देमाल पोलिस नाईक मराळे यांनी जप्त केलेला आहे.

बंद कंपनीच्या आत सुरू होती 'डर्टी पार्टी'; पोलिस घुसले अन्...

सदर गुन्ह्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल आनंद पवार यांनी आरोपी १) संभाजी उत्तम सरडे (वय 50 राहणार कवीटगाव), २) राजेंद्र मल्हारी ठोंबरे (राहणार पांगरे), ३) संदीप मच्छिंद्र खाडे (राहणार शेलगाव) व यांचे ट्रॅक्टर वरील तीन अज्ञात चालकाविरुद्ध करमाळा पोलिस स्टेशन येथे भाद वि 379 व पर्यावरण कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास पोलिस नाईक गणेश शिंदे करत आहेत.

धक्कादायक! कोरोनाला अक्षरशः चिरडून मारले...

वरील कारवाईचे तालुक्यातून कौतूक होत असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. कोणी अवैध वाळू उपसा वाहतूक अथवा अवैद्य धंदे करत असल्यास करमाळा पोलिस स्टेशनची संपर्क साधावा, असे आवाहन करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला; काय सुरू, काय बंद पाहा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: solapur crime news karmala police action on sandmafia and jc
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे