फसवी जाहिरात अन् नागरिकांचे दोनशे कोटी पेक्षा जास्त पैसे घेऊन फरार...

बार्शी येथील नागरिकांना 21 दिवसांमध्ये डबल पैसा करून देतो म्हणून गुंतवणूक करायला लावून करोडो रुपयाला गंडा घातला.

बार्शी (सोलापूर): एका महिन्यामध्ये डबल पैसे देतो, अशा फसव्या योजने खाली बार्शीतील नागरिकांचे दोनशे कोटी पेक्षा जास्त पैसे घेऊन फरार झाला आहे.

धक्कादायक! दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानला फरार...

बार्शी येथील नागरिकांना 21 दिवसांमध्ये डबल पैसा करून देतो म्हणून गुंतवणूक करायला लावून करोडो रुपयाला गंडा घातला. बार्शीतील फटे नावाच्या व्यक्तीने शेअर मार्केटच्या योजनेखाली बार्शीतील नामवंत आणि पैशाने गडगंज असणाऱ्या लोकांबरोबर शेअर मार्केटींग करून दोनशे कोटी पेक्षा जास्त रुपयांना गंडा घातला आहे, अशी चर्चा बार्शी शहरातून हळू आणि दबक्या आवाजात केली जात आहे.

अभिमानास्पद! पोलिस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’

फटे यांनी सुरुवातीला काही लोकांकडून लाखात आणि कोटीत रक्कमा घेतल्या व त्यावर एका महिन्यात 28% रक्कम दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. या चर्चेतून या व्यक्तीने त्याचा फायदा घेत बार्शीतील बऱ्याच लोकांना पैसे घेऊन 28% रक्कम दिली. त्यामुळे त्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास बसला आणि शहरातील अनेक नामवंत व्यक्ती, डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी यांनी या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला आणि तो पैसा घेऊन तो येथून निघून गेला.

युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

फटे या व्यक्तीबरोबर आणखीन चार ते पाच जणांची टीम असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. परंतु, या बाबतीत कोणीही पुढे होऊन वाच्यता करण्यास तयार नाही. अद्याप तरी पोलिस ठाण्यात कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढे हे प्रकरण काय वळण घेणार? याकडे बार्शीतील फसलेले नागरिक लक्ष लावून बसलेले आहेत.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: solapur barshi crime news 200 cr money fraud and run away
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे