शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी

तलवार, लोखंडी गज आणि काठ्यांच्या साह्याने दोन गट एकमेकांना भिडले

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली असून २७ जणांवर परस्पर विरोधी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरुर: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबाचे वाद टोकाला गेल्याने चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून लाठ्या-काठ्या, लोखंडी गज आणि तलवारी हातात घेऊन जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली असुन दोन्ही गटाच्या एकुण २७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५९वी स्थानबध्दतेची कारवाई

जमिनीच्या वादातून भाऊच भावाचा वैरी झाल्याचं याठिकाणी पाहायला मिळालं असून या प्रकरणात दोन्ही गटातील लोक जखमी झाले असुन शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मिना बबन शितोळे यांनी अकरा जणांवर आर्म अँक्ट सह इतर गुन्हे दाखल केले असून दुसऱ्या गटाच्या तारा दिनकर शितोळे यांनीही सोळा जणांवर आर्म अँक्ट सह इतर गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटातील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असुन शिरुर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ६९ वी कारवाई

यापूर्वीही कवठे येमाईमध्ये जमिनीच्या वादातून भावकीमध्ये दोन खुन झालेले असताना पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊन जमिनीच्या वादातून भावकीमध्येच खुनी हल्ला झाला आहे. जमिनीचे वाद मिटवण्यासाठी  जलदगतीने आलेल्या तक्रारीवर आता गावपातळीवर, प्रशासकिय पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. एका आईचा उदरातून जन्म घेतलेले भाऊ -भाऊ जमिनीच्या वादापाई एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. शासनस्तरावर वर्षानुवर्षे जमिनीचे वाद चालू असल्याने अनेकवेळा दोन्हीही बाजुच्या लोकांचे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे काही कुटुंबामध्ये रागाच्या भरात एकमेकांना अद्दल घडविण्यासाठी संघर्ष पहायला मिळत आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लावला आणखी एका टोळीवर 'मोक्का'

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: so in Shirur taluka brother became brother s enemy
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे