सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी भरती...

सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

सिंधुदूर्ग: सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या साईटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे, असे प्रभारी पोलिस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. 

अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309 , पोलिस भरती मदत केंद्र कक्ष 02362-228008/ सिंधुदुर्ग पोलिस नियंत्रण कक्ष - 02362228614 येथे संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलिस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: sindhudurg police constable recruitment news examination on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे