शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गुजरातला गेले असताना पाच आमदारांना सुरतमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गुजरातला गेले असताना पाच आमदारांना सुरतमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांकडून पालखी सोहळयाचे प्रत्येक अपडेट 'एका क्लीकवर'

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचे होते. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. मारहाण झालेल्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई

दरम्यान, सूरतला गेलेल्या अनेक आमदारांना महाराष्ट्रात परत यायचे आहे. पण त्यांना येऊ दिले जात नाही. अनेक आमदार गुजरातच्या सीमेवरही आले. पण त्यांना महाराष्ट्रात येऊ दिल जात नाही. त्यातूनच झालेल्या संघर्षात आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: shivsena 5 rebel mlas beaten in surat maharashtra home minis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे