...म्हणून शिक्रापूर पोलिस चार दिवस झोपलेच नाहीत!

कोरेगाव भीमा बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे अहोरात्र कष्ट

शिक्रापूर पोलिसांच्या कष्टाचे चीज झाले असून, बंदोबस्त आणि कार्यक्रम देखील सुरळीत पार पडला आहे. शिक्रापूर पोलिसांच्या कार्याचे आता कौतुक होत आहे.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन (Shikrapur Police Station) हद्दीमधील कोरेगाव भीमा (koregaon bhima) येथील एक जानेवारी रोजी होणारा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी अहोरात्र कष्ट केले आहेत. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहा पोलिस अधिकारी व तब्बल पंचवीस पोलिस कर्मचारी हे तब्बल चार दिवस म्हणजे नव्वद हून अधिक तास झोपलेच नाहीत. शिक्रापूर पोलिसांच्या कष्टाचे चीज झाले असून, बंदोबस्त आणि कार्यक्रम देखील सुरळीत पार पडला आहे. शिक्रापूर पोलिसांच्या कार्याचे आता कौतुक होत आहे.

धक्कादायक! पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; कशी ती पाहा...

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०१८ रोजी दुर्दैवी हिंसाचार झाला. त्यांनतर १ जानेवारी २०१९ पासून येणाऱ्या मानवंदना कार्यक्रमासाठी शिक्रापूर पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जात, कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागले. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे शिक्रापूर परिसरात तळ ठोकून होते. राज्यभरातून पुणे ग्रामीण साठी तब्बल तीन हजार पाचशे पोलिस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान, होमगार्ड याचा बंदोबस्त बोलाविण्यात आलेला होता. सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, विक्रम साळुंके, रणजीत पठारे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड, जितेंद्र पानसरे, किशोर तेलंग, चंद्रकांत काळे, पोलिस नाईक संतोष शिंदे, प्रताप कांबळे, महेंद्र पाटील, बापू हडागळे, विकास पाटील, अमोल दांडगे, लखन शिरसकर, प्रतिक जगताप, कृष्णा व्यवहारे, जयदीप देवकर, किशोर शिवणकर, श्रीमंत होनमाने, पोलिस नाईक संतोष पवार, संतोष मारकड, हेमंत कुंजीर, अतुल पखाले, तेजस रासकर, रोहिदास पारखे, सचिन होळकर, शिवाजी चितारे, विशाल देशमुख, गणेश करपे, राहुल वाघमोडे महिला पोलिस नाईक राणी भागवत हे तब्बल तीस पोलिस अधिकारी व कर्मचारी हे तब्बल चार दिवस म्हणजे नव्वद हून अधिक तास झोपलेच नाही.

धक्कादायक! पुणे शहरात वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱयाची आत्महत्या

दरम्यान, बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार दिवसाची निवासाची, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम करावे लागले आहे. यामध्ये पोलिस बंदोबस्त विभागून देणे, निवासाची व्यवस्था करणे, जेवणाची व्यवस्था करणे, बंदोबस्तसाठी यंत्र सामग्री पुरविणे हे कामे वेगवेगळ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागून देण्यात आलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये शिक्रापूर पोलिसांनी परिसरातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले होते. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी, कोंढापुरी, वढू बुद्रुक, सणसवाडी यांसह आदी गावांमध्ये नागरिकांच्या बैठका घेत शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. या काळामध्ये २८ डिसेंबर पासून एक जानेवारी पर्यंत शिक्रापूर पोलिस स्टेशन मधून बंदोबस्त आणि बंदोबस्तातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयींसाठी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहा पोलिस अधिकारी व तब्बल पंचवीस वीस पोलिस कर्मचारी हे तब्बल चार दिवस म्हणजे नव्वद हून अधिक तास झोपलेच नाही.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

कोंढवा पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी तडीपार...

दोन जानेवारी रोजी बंदोबस्त शांततेत आणि सुरळीत पार पडल्यामुळे अनेक स्थरातून आणि वरिष्ठांकडून शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पोलिसांच्या चेहऱ्यावर देखील आनंद ओसंडून वाहत होता. परंतु, होणाऱ्या शुभेच्छांचा वर्षावामुळे मात्र पोलिसांची पुन्हा झोपच उडून गेली. सर्व काही होऊन देखील वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांकडून झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना समाधान मिळाले व बंदोबस्त शांततेत पार पडला. याबाबत बोलताना सदर बंदोबस्त शांततेत पार पडला यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक, ग्रामस्थ व पत्रकारांनी केलेल्या कामाचे चीज झाले असल्याचे शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: shikrapur police continue 90 hrs duty on koregaon bhima 1 ja
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे