बापरे! नवऱयाचा खून करून मृतदेह शिजवला कढईत...

पती-पत्नीच्या भांडणानंतर पत्नीने पतीचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह कापून कढईत शिजवल्याची धक्कादायक घटना जरानिन येथे घडली आहे.

सर्बिया : पती-पत्नीच्या भांडणानंतर पत्नीने पतीचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह कापून कढईत शिजवल्याची धक्कादायक घटना जरानिन येथे घडली आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. टेरेसा या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बाथरूममध्ये शारिरीक संबंध ठेवताना घडली धक्कादायक घटना...

टेरेसा आणि तिच्या पतीमध्ये आळशीपणावरून भांडणे होत होती. दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर तिने आधी पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिने त्याची हत्या केली. यानंतर तिने पतीच्या शरीराचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते एका मोठ्या कढईत शिजवण्यासाठी ठेवले. संबंधित घटना मंगळवारी (ता. 10) रात्री 9 वाजता घडली. टेरेसाने ही हत्या केली तेव्हा तिची मुलगीही तिथे होती. तिने आपल्या आईविरुद्ध साक्ष दिली आहे. 

एचआयव्हीची तपासणी केल्यावर अहवाल पाहून धक्काच बसला...

आईने आपल्या वडिलांना कसा खून केला याबाबतची माहिती पोलिसांना दिली.  डी'एलजे असं या मुलीचे नाव आहे. ती टेरेसा यांच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. आपल्या सावत्र वडिलांचा खून तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. तिने सांगितलं की, हत्येवेळी तिचे वडील दारूच्या नशेत होते. पण तरीही त्यांना धोक्याची जाणीव झाली. ते जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि आई त्यांच्यावर चाकूने वार करत होती.

कोंबड्याच्या अपहरणामुळे पोलिसच आले अडचणीत...

पतीच्या हलगर्जीपणाला आणि आळसाला कंटाळून हत्या केल्याचे टेरेसाने पोलिसांना सांगितले. तिचा नवरा तिला घरच्या कामात अजिबात मदत करत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. काही दिवसांपूर्वीच टेसेसाने झोपेत असताना पतीच्या पलंगाला आगही लावली होती. या घटनेत पतीचा जीव वाचला. मात्र, यावेळी तिचा नवरा तिच्या तावडीतून वाचू शकला नाही. आरोपी टेरेसाला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: serbia crime news wife killed husband and cook his body part
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे