सातारच्या पोलिस अमंलदाराच्या धाडसाचे होतेय सर्वत्र कौतुक...

सोमनाथ शिंदे यांनी कशाची ही पर्वा न करता उंच टाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. टाकीवर जाऊन युवकाला वाचवणे महत्वाचे होते.

साताराः सातारा वाहतूक शाखेचे पोलिस नाईक सोमनाथ शिंदे यांनी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या युवकाचे प्राण वाचवले असून, त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल ड्रामा करत उडी मारणार असे वातावरण निर्माण झाले होते. त्याच क्षणी सातारा वाहतूक शाखेत कार्यरत असणारे अमंलदार सोमनाथ शिंदे यांना याची माहिती समजली. सोमनाथ शिंदे यांनी कशाची ही पर्वा न करता उंच टाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. टाकीवर जाऊन युवकाला वाचवणे महत्वाचे होते. परंतु, कशाचाही विचार न करता युवकाचा जीव वाचवण्यासाठी सोमनाथ शिंदे यांनी धाडसाने टाकीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. 

परंतु, हे सगळे गोपनीय पद्धतीने चालले होते. कारण टाकीवर पोलिस येत आहेत हे समजल्यावर युवकाने उडी मारली तर काय होईल? असे अनेक प्रश्न शिंदे यांच्या मनात आले होते. तरी देखील शिंदे यांनी धाडस दाखवत यशस्वी रीत्या त्या युवकावर झेप घेतली. त्याचे समूपदेशन करून त्याला खाली उतरविण्यात यश आले. पोलिस अमंलदार सोमनाथ शिंदे यांच्या या हजरजबाबी पणाला सातारकरांनी पण सलाम केला आहे.

Title: satara police news traffic police somnath shinde save youth
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे