धक्कादायक! पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलेच...
पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सातारा : मित्राने दिलेले उसने पैसे परत करता येत नसल्यामुळे पतीने धमकावून पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात घडली आहे.
फलटण पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पीडित विवाहिता ही २९ वर्षांची आहे. तिच्या पतीने घर बांधण्यासाठी अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. काही लोक पैसे मागण्यासाठी घरी येत होते. पती सायंकाळी घरी आल्यानंतर कोण-कोण पैसे मागायला आले ते पत्नी सांगायची. पतीचा एक मित्र नेहमी पैसे मागण्यासाठी घरी येत असे. मी मित्राकडून पैसे घेतले आहेत. परंतु मी त्याला पैसे परत देऊ शकत नाही, असे पती पत्नीला सांगत होता. काही दिवसांनी पतीचा मित्र पुन्हा पैसे मागण्यासाठी घरी आला. त्यावेळी पतीने मित्रासोबत बोल, असे सांगितलं. पत्नीने 'मला त्याच्याशी कशाला बोलायला लावले आहे, असे विचारले असता उलट पतीने तिला मारहाण केली. 'मी मित्राचे पैसे देऊ शकत नाही. माझ्याजवळ पैसेपण नाहीत. त्यावर मी एक उपाय शोधला आहे,' असे म्हणून पत्नीला त्याने मित्रासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुचवले.
पतीचा मित्र नोव्हेंबर २०२२ आणि डिसेंबर २०२२ या कालावधीत दोन वेळा घरी आला. त्यावेळी त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पाडले. मित्र घरात आल्यानंतर पती घराबाहेरचा जायचा. या प्रकाराला काही दिवस उलटल्यानंतर तो मित्र पुन्हा पतीला पैसे मागू लागला. त्यामुळे पतीने व घरातील इतरांनी त्या मित्राच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दे, असे तिला सांगितले. पत्नीने नकार देताच पतीने मारहाण केली. अखरे, पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पतीच्या मित्रासह अन्य काहीजणांवर बलात्कारसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
वहिनी आणि दीराच्या प्रेमसंबंधातून घडली धक्कादायक घटना...
सातारा पोलिसांचा 'तो' तपास थक्क करणारा...
महाविद्यालयीन युवतीला मोबाईलचा अति वापर ठरला जीवघेणा...
धक्कादायक! तुझी पत्नी माहेरी का पाठवली? तिला घेऊन ये, नाहीतर...
औरंगाबादमधील पेटवून घेतलेल्या प्रियकराचा अखेर मृत्यू; शेवटचे वाक्य...
औरंगाबादमध्ये प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...