साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या महिला रायडरचा मृत्यू...

एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नांदेड : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या महिला रायडरचा अपघाती मृत्यू झाला आहे. शुभांगी संभाजी पवार (वय 32) असे मृत महिला रायडरचे नाव आहे. शुभांगी या बाईकवरून पडल्यानंतर टँकरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला. सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्स महिला ग्रुप हा शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाला होता. साताऱ्याहुन नऊ महिला बाईकवर निघाल्या होत्या.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या महिलांच्या टीमला हिरवा झेंडा दाखवला होता. राज्यातील ठीक ठिकाणच्या देवीचे दर्शन घेत या महिला माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात होत्या. हा ग्रुप नांदेडमधील अर्धापुर येथे पोहचला होता. एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित आठ महिला सुखरूप आहेत. या घटनेबद्दल उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.

Title: satara bike rider shubhangi pawar accident at nanded ardhapu
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे