लष्करात भरती झालेल्या कन्येते फुलांचा वर्षावात स्वागत...

शिल्पा चिकणे हिची सहा महिन्यांपूर्वी आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आली.

सातारा: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण, भारत माता की जयचा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाच्या कडक एंट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले होते.

कॅप्टन अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान, तर...

शिल्पा चिकणे हिची सहा महिन्यांपूर्वी आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आली. त्या निमित्ताने आपल्या गावातील कन्येच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ग्रामस्थ विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गांजे गावातील पांडुरंग चिकणे यांची ती कन्या आहे. घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत मुलाच्या तोडीचे काम केले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या...

काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...

गांजे गावातून मेढ्याला पायी जात जावली करिअर अकॅडमीमध्ये प्रचंड कष्ट करीत शिल्पाने आसाम रायफलमधे भरती होण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमाने तिने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: satar news shilpa chikane join aasam rifal village people we
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे