सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

साधूंना लवंगा (ता. जत) येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली आहे.

सांगली : साधूंना लवंगा (ता. जत) येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली आहे. याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना ताब्यात घेऊन 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती.

साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. लवंगा (ता. जत) येथे चार चाकी गाडीतून आले यावेळी पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता एका विद्यार्थ्याला विचारला. यावेळी गावात पोरे चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली. आणि त्यात चारही साधूंना  मोटारीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलिस महासंचालकानी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षकांसह मोठी टीम बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी होती. यातील संशयित आरोपी म्हणून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पालघर येथेही यापूर्वी अशीच घडली होती. गैरसमजुकीतून साधूचा ठेचून बळी घेतला होता. या मारहाणीनंतर साधूंचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अजूनही विस्मरणात गेलेला नसताना पालघर प्रकरणाशी साधर्म्य असलेली घटना घडली आहे.

सांगलीत साधूंनी फक्त मुलाला रस्ता विचारला अन् गैरसमज झाला...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

बापरे! सांगलीमधील नऊ जणांची हत्या कशी केली पाहा...

सांगलीमधील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी ११ जणांना अटक

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

बापरे! सांगलीत चिमुकल्याच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यात पत्नीचा खून करून नवरा फरार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: sangli sadhu beating case registered against 22 people in ei
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे