उसाच्या शेतामध्येच जावयाने केली सासऱ्याची हत्या; कारण...

उसाच्या शेतामध्ये काम करत असलेल्या सासऱयाची जावयाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सांगली : उसाच्या शेतामध्ये काम करत असलेल्या सासऱयाची जावयाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याची हत्या केल्यानंतर आरोपी जावई फरार झाला असून, जत पोलिस ठाण्यामध्ये जावयासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीला नांदवायला पाठवत नाही म्हणून संतापलेल्या जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची घटना दरीबडची (ता. जत) येथे घडली आहे. आप्पासो मल्लाड असे हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे. सचिन बिल्लोळे असे हत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. आप्पासो पाटील यांची मुलगी तेजश्री हिचा दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील एगळी गावातल्या सचिन बिल्लोळे याच्याशी विवाह झाला होता. पण, सासरी वारंवार होत असलेल्या घरगुती वादाला कंटाळून गेल्या सहा महिन्यांपासून तेजश्री ही आपल्या माहेरी राहत आहे. तिने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

घटस्फोट देण्यास नकार देत पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी सचिन बिल्लोळे हा करत होता. सासरे आप्पासो मल्लाड हे आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही, असा समज जावई सचिन बिल्लोळे याच्या मनामध्ये होता. याच रागातून रात्रीच्या सुमारास सचिन बिल्लोळे हा आपला भाऊ मिलन बिल्लोळे आणि अन्य दोघांच्यासह दरीबडची या ठिकाणी दाखल झाला. यावेळी उसाच्या शेतामध्ये काम करत असलेले सासरे आप्पासो मल्लाड यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि फरार झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! सांगली जिल्ह्यातील घटनेने उडाली खळबळ...

प्रेमविवाह! सांगलीमध्ये विवाहितेचाही दोन चिमुकल्यांसह दुर्दैवी अंत...

RTO अधिकाऱ्यांपुढे कपडे काढणाऱया युवकावर गुन्हा दाखल...

हृदयद्रावक! सांगलीत आई आणि तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

सांगलीत साधूंनी फक्त मुलाला रस्ता विचारला अन् गैरसमज झाला...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

बापरे! सांगलीमधील नऊ जणांची हत्या कशी केली पाहा...

सांगलीमधील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी ११ जणांना अटक

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

बापरे! सांगलीत चिमुकल्याच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यात पत्नीचा खून करून नवरा फरार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: sangli district crime news son in law muder father in law an
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे