सांगलीमधील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी ११ जणांना अटक

मिरज ग्रामीण पोलिसांनी २५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

सांगलीः म्हैसाळच्या अंबिकानगर (ता. मिरज) भागातील एका घरामध्ये मंगळवारी (ता. २०) नऊ जणांचे मृतदेह सापडले होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी २५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, ११ जणांना ताब्यात घेतले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे अकरा जण छोटे-मोठे सावकार आहेत. 

धक्कादायक! सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळले...

म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये सोमवारी (20 जून) दोन सख्ख्या भावाच्या कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक माहितीनुसार सांगलीतील मिरज परिसरात राहणाऱ्या या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

मृतदेहांसोबत कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन या दोन भावांच्या कुटुंबीयांनी ही सामूहिक आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत सहा मृतदेह सापडले. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
आत्महत्या केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणेः
पोपट यल्लापा वनमोरे (वय 52 वर्षे)
संगीता पोपट वनमोरे (वय 48 वर्षे)
अर्चना पोपट वनमोरे (वय 30 वर्षे)
शुभम पोपट वनमोरे (वय 28 वर्षे)
माणिक यल्लापा वनमोरे (वय 49 वर्षे)
रेखा माणिक वनमोरे (वय 45 वर्षे)
अनिता माणिक वनमोरे (वय 28 वर्षे)
आदित्य माणिक वनमोरे (वय 15 वर्षे)
अक्काताई वनमोरे (वय 72 वर्षे)

बापरे! सांगलीत चिमुकल्याच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यात पत्नीचा खून करून नवरा फरार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: sangli district crime news nine suicide case police 11 arres
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे