पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा...

पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे.

सांगली : कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. मोटारीवर दगडफेक करत गाडी अडवून चाकूच्या धाकाने महिलांकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांबरोबर झालेल्या झटापटीत कारमधील 2 जण जखमी झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आगळगाव फाट्याजवळ दगडफेक करत चार ते पाच चोरट्यांनी कार अडवली. चाकूच्या धाकाने महिलांकडील 25 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन! पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली आहे. पोलिसांच्या श्वान पथक कुची जाखापुर परिसरात घुटमळले. या प्रकरणी वकील असलेल्या भाग्यश्री विलास पाटील (वय 28 रा. सरनोबतवाडी कोल्हापूर) यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत माधवी जनार्दन जाधव (वय 25 रा. कोल्हापूर) आणि विकास परशुराम हेगडे (वय 22, रा. कोल्हापूर) हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! सांगली जिल्ह्यातील घटनेने उडाली खळबळ...

प्रेमविवाह! सांगलीमध्ये विवाहितेचाही दोन चिमुकल्यांसह दुर्दैवी अंत...

RTO अधिकाऱ्यांपुढे कपडे काढणाऱया युवकावर गुन्हा दाखल...

हृदयद्रावक! सांगलीत आई आणि तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

सांगलीत साधूंनी फक्त मुलाला रस्ता विचारला अन् गैरसमज झाला...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

बापरे! सांगलीमधील नऊ जणांची हत्या कशी केली पाहा...

सांगलीमधील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी ११ जणांना अटक

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

बापरे! सांगलीत चिमुकल्याच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यात पत्नीचा खून करून नवरा फरार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: sangli crime news unknown thieves stopped car going to pandh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे