धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही सचिन दुपारी घरी गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

सांगली: कडेगाव येथे घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबत अल्पवयीन पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सचिन सुरेश पवार (रा. निमसोड, ता. कडेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

कडेगाव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात पीडितेचे आई-वडील बाहेर गेले होते. पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही सचिन दुपारी घरी गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार कोणास सांगितला तर तुला व तुझ्या आई व वडिलांनी जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

पीडित मुलगी जुलै 2022 मध्ये कराड येथे कॉलेजला एस.टी. बसने जात असताना बसचा पाठलाग केला. कराड-सैदापूर कॅनॉलजवळ बसमधून पीडित खाली उतरल्यानंतर संशयिताने तिला फोन का उचलत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. 

पत्नीला विहिरीत दिले ढकलून...
इस्लामपूर येथील कोळी मळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी सरनोबत यांचा विहिरीत पाय घसरून व पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या विवाहितेचा मृत्यू अपघाती नसून त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन मुली झाल्याच्या रागातून पतीनेच विहिरीत ढकलून पत्नीला विहिरीत ढकलून दिले. रात्री उशिरा राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: sangli crime news a minor girl was tourcher there was no one
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे