रत्नागिरी पोलिसांकडून मानवतेचे दर्शन

रत्नागिरी : टाळेबंदीच्या काळात अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असताना वृद्धांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.याच दरम्यान रत्नागिरी पोलीसांनी घरी एकट्या असलेल्या वृद्धांना घरी जाउन तत्परतेने औषधे पोहोचविण्याचे मानवतेचे कार्य केले.

रत्नागिरी : टाळेबंदीच्या काळात अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असताना वृद्धांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच दरम्यान रत्नागिरी पोलीसांनी घरी एकट्या असलेल्या वृद्धांना घरी जाऊन तत्परतेने औषधे पोहोचविण्याचे मानवतेचे कार्य केले.

राज्यात सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यावेळी अनेक नागरिक परगावी अडकले होते.वाहतुकही बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे केवळ अत्यावश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील पनवेल येथील लेफ्टनंट कर्नल अनिल कदम यांचे आईवडील घरी एकटे राहत होते. त्या वृद्ध माता-पित्यांना तातडीने औषधे पोहोच करणे गरजेचे होते. कर्नल कदम हे येउ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी पोलीसांना याबाबत फोनद्वारे कल्पना दिली.

त्यांच्या या विनंतीची दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी कर्नल कदम यांचे घर शोधत स्वत: औषधे व रोख रक्कम दहा हजार रुपये वृद्ध माता-पित्यांच्या हाती सोपविले. लॉक डाउन काळात रत्नागिरी पोलीसांनी कोरोनाचा बंदोबस्त बजावत असताना लेफ्टनंट कर्नल अनिल कदम यांच्या आई वडिलांना तत्परतेने औषधे पोहोच करुन खऱ्या अर्थाने मानवतेचे दर्शन घडविले आहे.

रत्नागिरी पोलिसांच्या या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रत्नागिरी पोलिसांच्या या कार्याचे मोठे कौतुक होत असून पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Title: ratnagiri police good help for senior citizen
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे