अंतर्वस्त्रामध्ये लपवलेल्या सोन्याचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने लावला छडा...

सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जयपूर (राजस्थान) : सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने छडा लावला असून, 56 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.

पोलिसांना सोन्याच्या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जयपूर विमानतळावर ही कारवाई केली आहे. जयपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाईत 55 लाख 92 हजार रुपयांचे सोने जप्त केले. एका आरोपीने आपल्या पॅंटमध्ये तर दुसऱ्याने अंतर्वस्त्रात सोने लपवून ठेवले होते. पँटमध्ये सोने लपवलेल्या आरोपीकडून 380 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या व्यक्तीकडून 576 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या दोघांनाही कारागृहात पाठवण्यात आले असून, न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने केरळमधील कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 85 लाख रुपये किमतीचे 1 हजार 979 ग्रॅम सोने जप्त केले आहे. अब्दुल असे या प्रवाशाचे नाव असून तो मूळचा मलप्पुरमचा रहिवासी आहे. पायाला सेलोटेपच्या मदतीनं त्याने हे सोनं लपवून आणले होते.

विमानतळावर सोने तस्करीची नवीनच पद्धत आली समोर अन्...

बँकॉकवरून आलेल्या महिलेने कसे लपवले होते सोने पाहा...

मुंबई विमानतळावर पकडले सोने; कसे लपवले होते पाहा...

मुंबई विमानतळावर 12 किलो सोने जप्त; कसे लपवले पाहा...

Video: लाखो रुपयांचे सोने कसे लपवले पाहा...

'अंडरवेअर'मध्ये लपवले होते लाखोंचे सोने; कसे ते पाहा...

बापरे! प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले अर्धा किलो सोनं...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: rajasthan crime news gold smuggling in jaipur airport 2 arre
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे