पुणे शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द; अशी आहे नवी नियमावली...

वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जरी पुणे महानगरपालिकेने घेतला असला तरी इतर सर्व निर्बंध हे अद्यापही कायम राहणार आहेत.

पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत सातत्याने कमी होऊ लागली आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पुण्यातील दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जरी पुणे महानगरपालिकेने घेतला असला तरी इतर सर्व निर्बंध हे अद्यापही कायम राहणार आहेत.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करत माहिती दिली की, पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आढावा बैठकीत केली असता त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यामध्ये समावेश असेल.

बापरे! पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक

खालील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते 11 सुरू राहणार

किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने)

कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्तीच्या सेवा)

पाळीव प्राणी खाद्याची दुकाने

पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने

चष्म्याची दुकाने

उर्वरित अत्यावश्यक सेवा. या दिनांक 14 एप्रिल 2021 व वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार सुरू राहतील.

पुणे मनपा क्षेत्रात कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचेही मनपाने स्पष्ट केले आहे.

कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी पुणे मनपाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती कायदा 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune weekend lockdown cancelled know new rules corona patien
प्रतिक्रिया (1)
 
Jalal Janmahamad Pathan
Posted on 28 May, 2021

Very Nice

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे