धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणे: एका वेटरने फेसबूक लाईव्ह करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, मूळ रा. उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव आहे.

पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

अरविंद सिंह राठौर हा मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. अरविंद याने आत्महत्येपूर्वी फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधीलच काही कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. फसवणूक झाल्याचा आरोप करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतली. अरविंद याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अरविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Pune waiter Facebook Live and jumping from 13th floor after
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे