अशोक कदम: आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
श्री. अशोक कदम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन, पुणे) हे पोलिस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत.पुणे: ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.
पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!
अशोक कदम: आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
श्री. अशोक कदम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन, पुणे) हे पोलिस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. दांडगा अनुभव. वयाच्या ५५व्या वर्षी युवकांना लाजवेल असा उत्साह, धष्टपुष्ट शरीर, व्यायामाची, गाण्याची आवड. उच्चशिक्षित अशा अधिकाऱ्याच्या शब्दकोषात 'वेळ नाही' हा शब्दच नाही. आरोपींसाठी निर्दयी आणि सहकाऱ्यांसाठी प्रेमळ अशा अधिकाऱ्याविषयी थोडक्यात...
अशोक कदम यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील एका सधन कुटुंबात झाला. बागायती जमीन, मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र. कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी. पोलिस दलात जाण्याचा कुटुंबियांचा सुरवातीला विरोध. अभियंता व्हावे, अशा कुटुंबियाच्या अपेक्षा. पण, पुढे ओघाने पोलिस दलात आले आणि त्यांचे जीवन सार्थक झाले. पोलिस दलात कार्यरत असल्याचा त्यांना मोठा अभिमान आहे. दिवसभरात सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न सोडवायला मिळाल्यानंतर आनंदी होऊन घरी गेल्यानंतर समाधानाने झोप लागते. यापेक्षा वेगळे समाधान काय असू शकते, असे श्री. कदम सांगतात.
शिक्षणः
नांदेड जिल्ह्यातील रुई धानोरा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. सातवी ते १० पर्यंतचे शिक्षण सगरोळी गावात तर ११वी १२वी (विज्ञान) नांदेड येथे झाले. परभणी येथून B.Sc. Aggri ची पदवी घेतली. नांदेड येथून LL.B.चे शिक्षण घेतले आहे. कुटुंब सधन, बागायती जमीन, उसाचे मोठे क्षेत्र होते. यामुळे घरी पैसा चांगल्यापैकी होता. शिवाय, कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. वडील राजकीय क्षेत्रात होते. गावचे सरपंच, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करत होते. राजकीय पार्श्वभूमी आणि कुटुंबामधील पोलिस दलात कोणी नसल्यामुळे अशोक कदम यांनी पोलिस दलात जावे, असा कुटुंबियांचा विचार नव्हता. शाळेमध्ये पहिल्यापासून हुषार असल्यामुळे इंजिनियर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण, आपण ठरवतो अगदी तसेच होते असेही नाही...
सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...
अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!
डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...