कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!

श्री. कुंडलिक कायगुडे यांची पोलिस दलात तब्बल ३८ वर्षे नोकरी झाली वयाच्या ५८व्या वर्षीही त्यांची शरीरयष्टी अक्षरशः युवकांना लाजवेल अशी पाहायला मिळते.

पुणे: ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. 

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...


कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
श्री. कुंडलिक कायगुडे यांची पोलिस दलात तब्बल ३८ वर्षे नोकरी झाली असून, ३१ जुलै २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. वयाच्या ५८व्या वर्षीही त्यांची शरीरयष्टी अक्षरशः युवकांना लाजवेल अशी पाहायला मिळते. पोलिस दलातील धावपळीच्या जीवनात त्यांनी आरोग्याकडे कसे लक्ष दिले? याबाबत अगदी मनमोकळे बोलताना चेहऱ्यावरील हास्य तसूभरही कमी होत नाही...

श्री. कुंडलिक कायगुडे यांची पोलिस दलामध्ये तब्बल ३८ वर्षे नोकरी. पण, सेवानिवृत्तीकडे वाटचाल सुरू असतानाही चेहरा अगदी हसरा आणि प्रचंड तेज. पोलिस दलातील धावपळीच्या, ताणतणावाच्या काळामध्ये त्यांनी दैनंदिन कामाबरोबरच आरोग्याकडेही प्रामुख्याने लक्ष दिले. त्यामुळेच आजही त्यांचा फिटनेस टिकून आहे. पोलिस दलात नोकरीमध्ये असताना जेवणाच्या वेळा निश्चित नसतात. पण, आपण आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच दुहेरी फायदा होतो, असा मोलाचा सल्ला श्री. कायगुडे देतात.

कोणतेही क्षेत्र असले तरी धावपळ आणि कामाचा ताणतणाव असतोच. पण, आरोग्य जर व्यवस्थित असेल तर कामही उत्कृष्ट पद्धतीने होते आणि ताणतणावही दूर होतो. शरीरयष्टी अगदी फिट असल्यामुळे आरोपींना पकडताना अनेकदा फायदा झाला आहे. एखादे उदाहरणच द्यायचे झाले तर पुणे शहरातील देता येईल. २५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी पुणे शहरात स्वारगेट एसटी स्टॅंडमधून चालक संतोष माने याने मृत्यूचे थैमान घातले होते. संतोष माने याने स्वारगेट एसटी बसस्थानकातील बस पळवून नेत अनेकांना उडविले. त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आणि ४० ते ५० वाहनांचे नुकसान झाले होते. संतोष माने याची माहिती समजताच वेगाने घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष माने याला एका झटक्यात पकडले. त्याला पकडल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. शरीरामध्ये चपळता असल्यामुळेच हे करू शकलो. माझ्या कामाची दखल घेऊन याबाबत मला पुरस्कारही मिळाला, पण हे चपळाईमुळे करू शकलो, असे श्री. कायगुडे सांगतात.

मुंबई, पुणे, खंडाळा, कोयना, महाबळेश्वरसह विविध ठिकाणी ३८ वर्षे नोकरी झाली. विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडत असताना कामाच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. एवढी वर्षे नोकरी केली असली तरी कोणतेही व्यसन लागले नाही. 

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

​पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...​

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!​

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!​

अशोक कदम: आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!​

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!​

अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!

शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune policekaka book pi kundlik kaygude interview fitness an
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे