अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
पोलिस दलातील पिकॅपचे अॅट्रॅक्शन आणि दबंध अधिकारी म्हणून चर्चेत असलेले एक नाव म्हणजे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर.पुणे: ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.
पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
कुटुंबात पोलिस दलाचा कोणताही वारसा नाही. गरीब कुटुंबात जन्म. लहानपणापासूनच जिद्द, प्रचंड काम, मेहनतीची आवड. ध्येय पूर्ण करण्याचा रात्रं-दिवस ध्यास. विविध कामांचा अनुभव आणि जिद्दीने एमपीएससीचा अभ्यास पूर्ण करून आवडत्या क्षेत्रात पदार्पण. पोलिस दलातील पिकॅपचे अॅट्रॅक्शन आणि दबंध अधिकारी म्हणून चर्चेत असलेले एक नाव म्हणजे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर. अनिता हिवरकर या सध्या बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिस दलात कार्यरत असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान. बालपण ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर त्यांच्यासाठी एकच शब्द फुटतो तो म्हणजे 'जिद्दीला सलाम'....
पुणे जिल्ह्यातील सासवड हे अनिता हिवरकर यांचे गाव. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक. चार भावंडे. त्यामध्ये तीन बहिणी आणि एक भाऊ. वडिलांचा तुटपुंजा पगार. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कायमच बेताची. अनिता यांचे बारावीपर्यंत शिक्षण सासवडमध्ये झाले. मोठ्या तिन्ही बहिणींचे लांब लचक केस. मुलांना शाळेत पाठवताना आईला तिन्ही बहिणींच्या वेण्या घालाव्या लागत. अनिता या सर्वांत लहान. भावासोबत त्यांनाही वडील केस कापायला दुकानामध्ये घेऊन जात. कारण वेण्या घालायचा वेळ वाचावा म्हणून. पण, पुढे एक सवयच लागली. लहानपणापासून ते आजपर्यंत त्यांनी केस कधी वाढवलेच नाहीत. कायमच बॉयकट. बॉयकटची सवय लागली ती पोलिस दलात आल्यानंतरही.
लहानपणापासून केस मुलासारखे कापत असल्यामुळे मुलासारखेच वागल्या. खेळसुद्धा मुलांचेच खेळायच्या. दहावीपर्यंत एक वात्रट मुलगी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. कुटुंबियांनीसुद्धा मुलगी म्हणून कधी वागवले नाही. पण, परिस्थितीमुळे शाळेत असल्यापासूनच कष्ट करण्याची सवय त्यांना लागली होती. शाळेत असतानाच पैसे मिळण्यासाठी शेतामध्ये विविध कामे केली. वयाच्या ११व्या वर्षी ३०० रुपये पगारावर सुट्टीत नोकरी केली. सुट्टी आणि घरी बसले असे कधी झालेच नाही. सतत काही ना काही काम करत राहायचे. कारण, वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर घरखर्च चालवणेसुद्धा मोठ्या जिकरीचे काम होते. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. जिद्दीने काम करून पुढे जायचे हे लहानपणापासूनच ठरवले होते.
एक-एक वर्ष पुढे जात होते. शाळा आणि सुट्टीत काम, हे समिकरणच झाले होते. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला जाण्याचे ठरवले. पुणे शहरात गेल्यानंतरही काम करूनच शिक्षण पूर्ण करावे लागणार होते, हे त्यांना माहित होते. सदाशिव पेठेत होस्टेलवर राहण्याची व्यवस्था झाली. कॉम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश घेतला. सासवडवरून एसटीने डबा यायचा. डबा घेण्यासाठी स्वारगेटला जावे लागायचे. आई डबा करून एसटीने सकाळी पाठवायची. सदाशिव पेठ ते स्वारगेट चालत जाऊन डबा आणायचा आणि दोन्ही वेळेस तो खायचा, असा दिनक्रम ठरलेला. परिस्थिती सर्व काही शिकवत असते.
पुण्यात आल्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कॉम्प्युटर कोर्ससाठी कर्ज काढले होते. नोकरी करून तर कर्ज फेडावे लागणार होते. कॉम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या सरांना परिस्थिती सांगितली. पुणे शहरात पहिली नोकरी १३०० रुपयांवर मिळाली. नोकरी मिळाल्याचा आनंद होता. १३०० रुपयांमधून ५०० रुपये होस्टेल, ५०० रुपये क्लासची फी आणि राहिलेल्या ३०० रुपयांमध्ये महिना काढायचा. त्या ३०० रुपयांमध्येही पुस्तकांवर खर्च व्हायचा. असा १३०० रुपयांचा तंतोतंत हिशोब असायचा. दिवस पुढे-पुढे सरकत होते...
पुणे शहरात असताना विविध ठिकाणी त्यांनी मिळेल ते काम केले. कामाची कोणतीही लाज बाळगायची नाही हे ठरवलेले. विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या आहेत. कोणते क्षेत्र नाही की तेथील कामाचा अनुभव नाही, असे नाहीच. मुंबईवरून कपडे आणून विकणे असो वा फर्ग्युसन कॉलेजसमोर स्टॉल लावून विविध वस्तूंची विक्री करणे असो. अनेक कामांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परस्थितीमुळे त्यांना खूप काही शिकायला मिळाले. यामुळे आज कोणते काम माहित नाही, असे नाही. त्या अनुभवाचा पोलिस दलात काम करत असतानाही त्यांना फायदा होत आहे. कोणत्याही कामाचा अनुभव कधीच वाया जात नाही, हा तरी माझा स्वतःचा अनुभव आहे, असेही अनिता हिवरकर सांगतात.
कॉम्प्युटर कोर्स बरोबरच पुणे विद्यापीठातून बाहेरून शिक्षण सुरू होते. परीक्षा एक महिन्यावर आली की नोकरी सोडायची आणि अभ्यास करायचा. परीक्षा देऊन झाली की परत नव्याने नोकरीचा शोध घ्यायचा. हे दरवर्षी ठरलेले होते. यामुळे प्रत्येकवेळी वेगळी नोकरी मिळायची. पण, नोकरी मिळाली नाही असे कधी झालेच नाही. अर्थात परिस्थितीमुळे नोकरी मिळवावीच लागत होती. कारण, एका ध्येयापर्यंत मजल मारायची होती...
सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...
अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
अशोक कदम: आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!
डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...