पुणे पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल; कोणते ट्विट पाहा...

पुणे पोलिसांनी केलेले एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे: पुणे पोलिसांनी केलेले एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा सिनेमा गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील एका डायलॉगचा आधार घेऊन हे ट्विट केले आहे. पुणे शहर पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी या चित्रपटातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केला आहे.

पुणे शहर पोलिस दलातील 575 पोलिसांना पदोन्नती!

2012 मध्ये रिलीज झालेला गँग्स ऑफ वासेपुरमधील एका सीनवर अतिशय लोकप्रिय असे मिम्स आहेत. याचाच आधार घेऊन पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन घोटाळ्याबाबत जनजागृती करणारे ट्विट केले आहे. चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉग “Chaabi kahan hai?” (चावी कुठे आहे?) असं ट्विट करत पोलिसांनी एक प्रकाराचा इशारा दिला आहे. स्वस्त किंमतीत दुचाकी वाहनांसारख्या वस्तू विकणार्‍या काही विशिष्ट वेबसाइटवर असत्यापित यादीमध्ये न पडण्याचा इशारा पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ऑनलाईन वाहन खरेदी घोटाळ्याच्या घटना घडत आहेत. ऑनलाईन वाहन खरेदी केल्यानंतर कागदपत्रमध्ये बरेच त्रुटी असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनजागृती करण्याचे ठरवले. ऑनलाईन गाडीचा व्यवहार करताना विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळूनच व्यवहार करा, असे सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police tweet warn people against cybercrime using gangs
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे