श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे पोलिसांचा गौरव!

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट यांचे तर्फे पुणे शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुणेः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट यांचे तर्फे पुणे शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अनेक धडाकेबाज कारवाया करत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ११२ मोकोका अंतर्गत, ८८ एमपीडीए अंतर्गत कारवाया केल्या आहेत. तसेच दर महिन्याच्या क्राईम मिटींग मध्ये गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेऊन त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल बहिर्जी नाईक, विशेष कामगिरी पुरस्कार, युनिट ऑफ द मंथ यांसारखे पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. त्याचाच एक भाग म्हणून यंदा पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांनी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित केलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्त आयोजित गुरु महात्म्य पुरस्कार वितरण व संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

सदर कार्यक्रमामध्ये पुणे शहर पोलिस दलातील एकूण ०८ बहिर्जी नाईक पुरस्कार प्राप्त पोलिस अंमलदार, तसेच विविध शाखांमधील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांपैकी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलिस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, पोलिस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेलेमहेश त्रिंबक बामगुडे, पोलिस हवालदार युनिट १, गुन्हे शाखा,मारूती नामदेव पारधी पोलिस अंमलदार अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, ज्ञानेश्वर चित्ते पोलिस अंमलदार युनिट ३, गुन्हे शाखा,ज्ञानेश्वर चित्ते पोलिस अंमलदार युनिट ३, गुन्हे शाखा, यांना  संदीप कर्णिक (सह पोलिस आयुक्त, पुणे शहर) यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रमास संदीप कर्णिक (पोलिस सह आयुक्त पुणे शहर), संदीप सिंग गिल (पोलिस उप आयुक्त झोन १), ए राजा (पोलिस उप आयुक्त विशेष शाखा), स्मार्तना पाटील (पोलिस उप आयुक्त झोन २) तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष अँड. प्रताप परदेशी, खजिनदार महेंद्र पिसाळ व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

अमिताभ गुप्ता यांची एमपीडीए कायद्यान्वये ८८वी स्थानबध्दतेची कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत १११वी कारवाई...

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune police news shree datta mandir felicitation pune police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे