धक्कादायक! पुणे शहरात वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱयाची आत्महत्या

शिल्पा चव्हाण अत्यंत शांत, प्रेमळ पोलिस निरीक्षक म्हणून ओळखल्या जात होत्या. शिवाय, धाडसी कारवायांमुळे त्या नेहमी चर्चेत असत.

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संबंधित घटना उघडकीस येताच पोलिस प्रशासनाला धक्का बसला आहे. शिवाय, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

पुणेः महिला पोलिस कर्मचाऱयाची गळफास घेऊन आत्महत्या...

या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास केला जात आहे. शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली असून, आत्महत्येच्या मुख्य कारणाचा शोध घेतला जात आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

26/11: कसाबला फाशीपर्यंत पोचवणारा मराठी पोलिस अधिकारी...​

शिल्पा चव्हाण अत्यंत शांत, प्रेमळ पोलिस निरीक्षक म्हणून ओळखल्या जात होत्या. शिवाय, धाडसी कारवायांमुळे त्या नेहमी चर्चेत असत. त्याच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रांच चा पदभार त्याच्याकडे होता. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला होता. तसेच ‘ई- पास’ची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. अनेक दिवस त्यांनी भरोसा सेलमध्ये देखील काम केले होते. दरम्यान, त्याचां स्टाफ त्यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ फोन केल्या नंतर ही त्या फोन घेत नव्हत्या. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.  

पुणे जिल्ह्यातील महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ही खळबळजनक घटना ताजी असताना, आता एका वरिष्ठ पदावरील माहिला पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे.

धक्कादायक! पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

प्रेमप्रकरणातून महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune police news senior police inspector shilpa chavhan comm
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे