पोलिस भरती बाबत मोठी बातमी...

कोरोनामुळे गेली दोन वर्षे भरती प्रक्रिया रखडली होती. ती मार्गी लागण्यादृष्टीने पोलिसांनी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील 214 रिक्‍त जागांसाठी तब्बल 39 हजार तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यांची लेखी परीक्षा येत्या पाच ऑक्‍टोबरला होणार आहे. यंदा प्रथमच ही परीक्षा स्वतंत्र खासगी संस्थेकडून घेण्यात येणार आहे. जवळपास एका जागेसाठी सुमारे 183 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुकाने बंद: अजित पवार

कोरोनामुळे गेली दोन वर्षे भरती प्रक्रिया रखडली होती. ती मार्गी लागण्यादृष्टीने पोलिसांनी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी राज्यभरातून या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. त्यांना ई-मेलद्वारे परीक्षेचे प्रवेश पत्र पाठवण्याची प्रक्रिया येत्या बुधवारपासून (ता. 22) सुरू होईल. त्याचबरोबर http://mahapolicerecmahaitexam.in या पोर्टलवरूनही प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदी नाही; तर...

पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील 143 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षार्थींनी विहित ओळखपत्रासह उपस्थित राहावे. त्याचबरोबर त्यांना काही अडचण असल्यास शहर नियंत्रण कक्षाशी तसेच 9699792230/8999783728 किंवा 9309868270 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police news police recruitment pune cp amitabh gupta
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे