पुणे पोलिसमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना निरोप समारंभ

सदर कार्यक्रमाकरीता उपस्थित पोलिस अधिकारी अमलदार यांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शाल श्रीफळ भेटवस्तू देवून सत्कार केला.

पुणेः पुणे शहर पोलिस आयुक्तालयातून पोलिस अधिकारी, अमलदार सेवानिवृत झाले आहेत. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अयोजीत करण्यात आलेले कर्मचारी भारावून गेले.

पुणे पोलिसांनी काही तासांतच उलगडलं हत्येचं गूढ

फेब्रुवारी व एप्रिल २०२१ या मध्ये एकूण ५ पोलिस निरीक्षक, ०४ पोलिस उपनिरीक्षक, १८ पोलिस अमलदार असे एकूण पोलिस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झालेले आहेत. मे २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेले एकूण ४ रापोजा, १ पोनि, २ सपोनि, १० पोउनि, ५८ पोलिस अमलदार, २ पोलिस अधिकारी अमलदार सेवानिवृत्त झालेले आहेत. सदर कार्यक्रमाकरीता पोलिस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त प्रशासन जालिंदर सुपेकर,  पोलिस उप आयुक्त मुख्यालय श्रीमती स्वप्ना गोरे, पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा मितेश घट्टे ही सर्व अधिकारी उपस्थित होते.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

सदर कार्यक्रमाकरीता उपस्थित पोलिस अधिकारी अमलदार यांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शाल श्रीफळ भेटवस्तू देवून सत्कार केला. शिवाय, पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवून त्यांचे आभार मानले. पोलिस आयुक्त पुणे यांचेतर्फ अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police news police employee retired program arragnce cp
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे