महाराष्ट्र पोलिस दल हे सर्वोत्तम: गृहमंत्री वळसे-पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस दळणवळण व परिवहन कार्यालयाच्या आयोजित विविध प्रकल्पाचे उद्घाटन करुन आढावा घेण्यात आला.

पुणे : सन १९६० पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलिस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, अचूक निर्णयक्षम म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलाप्रती देशातील पोलिस दलाला नेहमी आदर वाटतो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.

महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्या पाठीशी: मुख्यमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस दळणवळण व परिवहन कार्यालयाच्या आयोजित विविध प्रकल्पाचे उद्घाटन करुन आढावा घेण्यात आला. त्यावेळी अपर पोलिस महासंचालक व संचालक रितेश कुमार, कारागृह व सुधारसेवा अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणता तो पाहा...

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्य बिनतारी संदेश विभागात प्रशिक्षणार्थी क्षमतावाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देत त्याचा पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

राज्यात डिसेंबर पर्यंत 5200 पोलिसांची भरती: गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड, पोलिस बिनतारी संदेश मुख्यालय परिसरातील 6 इमारती ११२.८४KW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, प्रतिवर्षी ३ कोटी लीटर पाणी साठा करण्याची क्षमता असलेला पर्जन्यजल पुनर्भरण (R WH) प्रकल्प, तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस बिनतारी संदेश संग्रहालय, सर जे.सी. बोस ई-लर्निंग केंद्राची पाहणी केली.

पोलिस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाचीः दिलीप वळसे पाटील

रा.गु. अ. वि. स्थापनेपासून अंगुलीमुद्रा, दस्तऐवज परीक्षण तसेच इतर तांत्रिक कामकाजामध्ये वापरण्यात येत असलेल्या जुन्या साहित्याचे वस्तुसंग्रहालय येथे असून, त्यास गृहमंत्र्यांनी भेट दिली. जतन करण्यात आलेल्या या वस्तू अमूल्य असून त्याबाबत त्यांनी कौतुक केले. संशयित आरोपीचा शोध व गुन्हे तपासाकरीता उपयुक्त ठरत असलेला रेखाचित्र विभाग गु. अ. वि. तर्फे नव्याने सुरू करण्यात आलेला असून त्यात तज्ज्ञांमार्फत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास भेट देऊन त्याची पाहणी केली, यशस्वी कामकाजाकरीता शुभेच्छा दिल्या.

राज्यातील पोलिस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत मजल मारता येणार: गृहमंत्री

संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या सीसीटीएनएस प्रणालीचा पोलिस कामकाजामध्ये कशाप्रकारे वापर होत आहे याबाबतचे प्रात्यक्षिक त्यांनी पूर्णवेळ हजर राहून पाहिले. या कामात महाराष्ट्र राज्य कायम अग्रेसर असेल याची दक्षता घ्यावी असे सांगून CCTNS मध्ये कार्यरत सर्वाशी हितगूज साधून त्यांचे अभिनंदन केले.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तिमाही सीआयडी बुलेटिन प्रसिद्ध होत असून, त्याच्या नव्या अंकाचे प्रकाशन गृहमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्यांनी गुन्हे अन्वेषण विभाग ही राज्यातील महत्वाची विश्वासू तपास यंत्रणा असून, त्यांचे कामकाज समाधान कारक चालू आहे. यापुढे गुन्हे तपासामध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करावा लागणार असून, त्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा व यंत्रणा प्राधान्यक्रमाने गुन्हे अन्वेषण विभागास राज्य सरकार कडून पुरवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपले मनोगतात व्यक्त केले.

यावेळी वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक सर्वश्री प्रवीण साळुंखे, फत्तेसिंह पाटील, मकरंद रानडे पोलिस उप महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police news home minister dilip walse patil visit crime
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे