समर्थ पोलिस ठाण्यात 'आयर्नमॅन'कडून पोलिसांना फिटनेसचे धडे...

पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्य देखील सदृढ राहील. आयर्नमॅन विजेते डॉ. कौस्तुभ राडकर सध्या गणेशोत्सव चालू असल्याने पोलिस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्तात व्यस्त आहेत.

पुणे: पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्य देखील सदृढ राहील. आयर्नमॅन विजेते डॉ. कौस्तुभ राडकर सध्या गणेशोत्सव चालू असल्याने पोलिस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्तात व्यस्त आहेत. बंदोबस्तदरम्यान पोलिसांवर अतिरिक्त ताण येत असल्याची बाब विचारात घेऊन त्यांच्या कामासाठी उत्साह यावा यासाठी १३/९/२०२१ रोजी ११-३० ते १२-३० वाजे दरम्यान समर्थ पोलिस ठाणे पुणे येथे ताणतणाव व व्यायाम याबाबत को प्रोटोकॉलचे पालन करुन आर्यनमॅन विजेते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

सदरचे व्याख्यानासाठी २८ वेळा आयर्नमॅन विजेते डॉ. कौस्तुभ राडकर (वय ३५), सहा वेळा आयर्नमॅन विजेते उदयोजक दशरथ जाधव (वय ६४), दोन वेळा आयर्नमॅन विजेते डॉ. राहूल झांजुणे (वय ४२), एक वेळा आयर्न विजेते हेमंत परमार (वय ४२) यांना आमंत्रणीत करण्यात आले होते. सदर चारही आयर्नमॅन विजेते यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये जर्मनी येथील हॅम्बर्ग येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आहे. या निमित्ताने त्यांचा समर्थ पोलिस स्टेशनचे वतीने पोलिस उप आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, परिमंडऴ ०१ पुणे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर वेळी समर्थ पोस्टे कडील अधिकारी, वपोनि विष्णू ताम्हाणे, गुन्हे उल्हास कदम, संदीप जोरे, हेमचंद्र खोपडे, श्रीमती ज्योति कुटे व श्रीमती मीरा त्र्यंबके, अधिकारी व ७० पोलिस अंमलदार आणि २० पोलिस मित्र उपस्थित होते.

किरीट सोमय्या यांचा मोठा आरोप; हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप...

डॉ. राडकर यांनी आयर्नमॅन स्पर्धेविषयी माहिती देऊन आयर्नमॅन स्पर्धेत सायकलींग, स्विमींग व रनिंग हे प्रकार एकाच वेळेस दिलेल्या १६ तासामध्ये पुर्ण करणे आवश्यक असते. पोलिसांना व्यायामाचे महत्व सांगून प्रत्येकाने स्वतःसाठी एक तास वेळ काढून व्यायाम करुन स्वतः आरोग्य सदृढ राखावे. पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्य देखील सदृढ राहिल असा आरोग्य सल्ला दिला. समर्थ पोलिस स्टेशन कडून मार्च २०२१ पासून सुरु करणेत आलेले सायकल पेट्रोलिंग अदयाप चालू असून त्याचा निश्चीतच पोलिसांचे फिटनेससाठी फायदा होत आहे, असे सांगितले.

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

सर्वांनी उपस्थित पोलिस अधिकारी, अंमलदार यांचे वेगवेगळया प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार रणजित उबाळे, सुशील लोणकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, हेमंत पेरण, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, धिरज शिंदे, मपोना. वनिता गोरे यांचा तसेच कोरोना काळात पोलिसांना व नागरीकांना मदत करणा-या २० पोलिस मित्रांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police news ganeshotsav time samarth police and ironman
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे