हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...

बारामती शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी शीतल जगताप गलांडे यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे.

बारामती: बारामती शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी शीतल जगताप गलांडे यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पती, एक मुलगी व 10 दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांनी बाळाला जन्म दिला होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शीतल जगताप गलांडे यांच्यावर पुणे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे. शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

शीतल या बारामती शहर पोलिस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलिस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलिस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे, मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करत होत्या. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...

हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन

पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...

नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune police news baramati police shital galande passes away
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे