पुणे पोलिसांनी डॉक्‍टरांच्या घराची बेल वाजली अन्...

डॉक्‍टर पतीने भावनिक साद थेट पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाचा घातली. पोलिस आयुक्त गुप्ता यांनीही ते ट्‌विट आवर्जुन पाहिले.

पुणे : पोलिसकाकांनी सकाळी साडेआठ वाजता डॉक्‍टरांच्या घराची बेल वाजली. डॉक्टरांनी दरवाजा उघडला तेव्हा, "हॅपी ऍनिव्हर्सरी' म्हणत एक पोलिसकाकाने डॉक्‍टर दाम्पत्यास शुभेच्छा देत त्यांच्या हातात केकचा बॉक्‍स दिला. पुणे पोलिसांच्या या "सरप्राईज गिफ्ट'ने डॉक्‍टर दाम्पत्य अक्षरशः भारावून गेले, त्यांनी भरभरून कौतुक करीत थेट पोलिस आयुक्तांचे आभार मानले.

पुणे पोलिस आयुक्तांनी इस्टाग्रामव्दारे साधला नागरिकांशी थेट संवाद!

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात डॉक्‍टर आणि पोलिस दोघेही रात्रंदिवस नागरिकांसाठी झटत आहेत. लॉकडाऊनमध्ये पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर थांबून नागरीकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी गेले वर्षभरापासून काळजी घेत आहेत. दुसरीकडे डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. रुग्णांची सेवा करणाऱ्या औंधमधील एका डॉक्‍टर दाम्पत्याचा शनिवारी (ता. 15) लग्नाचा वाढदिवस होता.

डॉक्‍टर दांपत्य सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर दोघेही रुग्णसेवा करून रात्री उशीरा घरी परततात. डॉक्‍टर पतीने त्यांच्या मनातील ही खदखद पुणे पोलिसांच्या @cppunecity ट्विटरवर टाकली होती. डॉक्‍टर पतीने शुक्रवारी थेट पुणे पोलिसांच्या @cppunecity या ट्टिर हॅंडलवर एक ट्विट केले. 'सर माझ्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे आणि सगळीच दुकाने बंद आहेत. केक आणण्यासाठीही जाऊ शकत नाही. आम्ही दोघेही डॉक्‍टर असून लग्नाच्या वाढदिवस असतानाही आम्ही कामावर आहोत. पत्नीसाठी अशा परिस्थितीत पत्नीला काय गिफ्ट देऊ, तुम्हीच सांगा.'' डॉक्‍टर पतीने भावनिक साद थेट पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाचा घातली. पोलिस आयुक्त गुप्ता यांनीही ते ट्‌विट आवर्जुन पाहिले. मात्र त्यांनी "त्या' ट्‌विटला तत्काळ प्रतिसाद दिला नाही. पोलिस आयुक्तांनी त्यांच्या पद्धतीने पोलिसांना सुचना पाठविली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलिस स्टेशनला अचानक भेट

शनिवारी सकाळी ठिक साडे आठ वाजता, डॉक्‍टरांच्या घराची बेल वाजली, डॉक्‍टरांनी दरवाजा उघडला तेव्हा, "हॅपी ऍनिव्हर्सरी' म्हणत एका पोलिसाने डॉक्‍टर दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी दाम्पत्याच्या हातात केकचा बॉक्‍स दिला. पुणे पोलिसांनी दिलेल्या या "सरप्राईज गिफ्ट'ने डॉक्‍टर दाम्पत्यही अक्षरशः भारावून गेले, 'पुणे पोलिस दलाचे मनापासून आभार. पुणे पोलिसांनी दिलेली हि सुंदर भेट आमच्यासाठी वेगळा आनंद देणारी आहे'' अशा शब्दात पुणे पोलिसांचे भरभरून कौतुक करीत त्यांनी थेट पोलिस आयुक्तांचे आभार मानले.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

Title: Pune police fulfills doctor couples wish to celebrate marria
प्रतिक्रिया (1)
 
Gari kulkarni
Posted on 16 May, 2021

Salam commishnar shri Gupta saheb

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे