पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन!

पुणे शहरात जातीय सलोखा व सामाजीक एकात्मता आबाधित राहण्यासाठी पुणेपोलिस आयुक्तालयाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणेः पुणे शहरात जातीय सलोखा व सामाजीक एकात्मता आबाधित राहण्यासाठी पुणेपोलिस आयुक्तालयाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 

पोलिसकाकाने वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून चेहऱयावर फुलवला आनंद...

पुणे शहरात जातीय सलोखा व सामाजीक एकात्मता बंधुभाव आबाधित राहण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचे वतीने व श्री.पी.ए. इनामदार आझम कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी (ता. ३०) सायं. ०६.०० वा. ते ०७.०५ वाजेच्या दरम्यान लष्कर पोलिस स्टेशन हद्दीतील आझम कॅम्पस कॅम्प पुणे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास पुणे शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरीक, शांतता कमिटी सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य यांना आमंत्रीत करण्यात आले होते.

'देवमाणसां'चा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार...

सदर रोजा इफ्तार पार्टीस पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी जातीय सलोखा आबाधित रहावा, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही. एकमेकामधील बंधुभाव रहावा सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी याबाबत आवाहन केले. सदर कार्यक्रमास पी. ए. इनामदार आझम कॅम्पस संस्थापक अध्यक्ष, चेतन विठ्ठल तुपे, आमदार हडपसर वि.सभा मतदार संघ, सुनिल कांबळे, आमदार पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ, मोहन जोशी कॉंग्रेस आय पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश बागवे कॉंग्रेस आय पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक अरविंद शिंदे मारुती आबा तुपे, मंगला मंत्री, वनराज आंदेकर, पुणे कॅन्टोन्मेंटचे सदस्य विनोद मथुरावाला, दिलीप गिरमकर, पुणे शहरातील नगरसेवक व सर्व पक्षाचे पदाधिकारी इतर प्रतिष्ठीत लोक असे सुमारे ३०० ते ३५० जनसमुदाय उपस्थित होता. 

पोलिसकाकाने स्वतःच्या खिशातून भरला जवानाच्या वाहनाचा दंड!

कार्यक्रमाची प्रस्तावना सागर पाटील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-२,पु णे शहर यांनी केली तर आभार प्रदर्शन राजमोहंमद राजे सहा पोलिस आयुक्त लष्कर विभाग यांनी केले. सदर कार्यक्रमाचे ठिकाणाचे व्यवस्थापन अशोक कदम वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन पुणे व स्टाफ यांनी केले होते.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

ज्योतिबा यात्रेत सासनकाठी नाचवलेले पोलिसकाका सांगतात...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune police commissioner arrange iftar party at azam campus
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे