पुणे पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन; 50 जणांना अटक

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरूवारी (ता. 8) रात्री कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

पुणे: पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरूवारी (ता. 8) रात्री कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यानुसार २४९ गुन्हेगारांची तपासणी केली असता, त्यामध्ये ६६ गुन्हेगार आढळून आले. त्याशिवाय आर्मअ‍ॅक्टनुसार ५० गुन्हे दाखल करून ५० जणांना अटक करण्यात आली.

पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, एकाचा मृत्यू...

गुन्हेगारांकडून ३६ कोयते, २ पालघन, सत्तूर, चाकू असा १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात राहत असलेल्या ९ सराईतांच्या मुसक्या आवळल्या आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही करण्यात आली.

पुणे 'एलसीबी'ची मोटारसायकल चोरांच्या विरोधात दमदार कारवाई

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली असून, त्यांच्याकडून २८ हजारांचे पिस्तूल जप्त केले आले. त्याशिवाय ३६ कोयते, २ पालघन, सत्तूर, चाकू असा १३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात राहत असलेल्या ९ सराईतांच्या मुस्क्या आवळल्या आल्या आहेत. त्यामध्ये सुधीर उर्फ गट्या चंद्रकांत गवस (रा. येरवडा), लक्ष्मीकांत उर्फ लक्या सुर्यकांत जावळे (रा. मंगळवार पेठ), अजरूद्दीन उर्फ अज्जु मेहबूब शेख (रा. हडपसर), खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे (रा. अपर बिबवेवाडी), मनोज अरूण पांडागळे (रा. कोंढवा), प्रेम अंकुश शिंदे (रा. आंबेगाव), सर्फराज उर्फ डर समीर शेख (रा. गंजपेठ), योगेश बाबूराव पाटणे (रा. कसबा पेठ), शुभम राजेश भोसले (रा. कसबा पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यात अजित पवारांच्या 'कडक' सुचना; पाहा काय सुरू, काय बंद...

दरम्यान, एनडीपीएस कायद्यानुसार दोन आरोपींना अटक करून ४० हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने लोणी काळभोर परिसरातील आरोपी सागर बाळू धोत्रे याला अटक केली. त्याशिवाय दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि प्रत्येक पोलिस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना केली आहे.

पुणे शहरातील युवतीची लाखो रुपयांची फसवणूक; कशी ती पाहा...

धक्कादायक! महिला डॉक्टरच्या बेडरुममध्ये सापडला स्पाय कॅमेरा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune police combing operation 50 arrested and arm act crime
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे