पोलिस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाचीः दिलीप वळसे पाटील

पुणे पोलिसांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नुकतीच पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांसाठी जीटीपीएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

पुणे : पोलिस दलातील बदल्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढी महत्वाची आहे. ओळखीच्या किंवा वशिलेबाजी करणाऱ्या लोकांना चांगल्या ठिकाणी बदली मिळण्यापेक्षा रीतसर अर्ज मागवून पोलिसांना संधी दिल्यास निश्चितच एक चांगला संदेश पोहोचेल. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनरल ट्रान्सफर पोलिस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) ही विकसित केलेली प्रणाली अत्यंत फायदेशीर आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

पुणे शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द; अशी आहे नवी नियमावली...

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पुण्याच्या पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. त्यांना पोलिस सलामी देण्यात आली. आयुक्तालयातील भरोसा विभागातील बाल सहाय्यता कक्ष, महिला सहाय्यता आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच गुन्हे शाखेला त्यांनी भेट देऊन कामाची माहिती करून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

पुणे पोलिसांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नुकतीच पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांसाठी जीटीपीएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली पुण्यासह इतर ठिकाणी देखील सुरू झाली आहे. पोलिस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. या प्रणालीचा पोलिस दलाला फायदा होणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune news home minisiter dilip walse patil visit police comm
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे