पुणे-नगर महामार्गावर दोन टेम्पोंमध्ये जोरदार धडक...

पुणे-नगर महामार्गावर समोरून चाललेल्या टाटा एस टेम्पोला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली.

पुणेः कारेगाव (ता. Shirur() येथे पुणे-नगर महामार्गावर (Pune Nagar Highway) समोरून चाललेल्या टाटा एस टेम्पोला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू होऊन पाच जण जखमी झाले आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आयशर टेम्पो चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांना पाहिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण...

कारेगाव (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावरून राकेश शेखावत हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एच यू ८९१६ ही टाटा एस गाडी घेऊन चालेले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच ४२ टी ९०३४ या आयशर टेम्पोची शेखावत यांच्या वाहनाला पाठीमागून धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात राजपालसिंग जगपालसिंग शेखावत, दत्तात्रय दिनकर दहिफळे, निलेश भीमराव पारखे, ओंकार दादासाहेब दहिफळे, विजय दादासाहेब दहिफळे, आशा संभाजी तापकीर हे अपघातात जखमी झाले. दरम्यान, या अपघातातील जखमी राजपालसिंग जगपालसिंग शेखावत (रा. संतनगर लोहगाव ता. हवेली जि. पुणे मुळ रा. ढहाना ता. सतनाला जि. महेंद्रगढ हरियाणा) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस घराजवळ दबा धरून बसले अन् काही वेळातच...

याबाबत राकेश राजपालसिंग शेखावत (रा. संतनगर लोहगाव ता. हवेली जि. पुणे मुळ रा. ढहाना ता. सतनाला जि. महेंद्रगढ हरियाणा) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एम एच ४२ टी ९०३४ या आयशर टेम्पोवरील अज्ञात चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे करत आहेत.

युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune nagar highway two tempo accident one dead five injured
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे