वाढदिवसाच्या स्टेटस नंतर श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवण्याची वेळ...

शिक्रापूर येथील अपघातात मृत्यू झालेला शुभम दिवेकर याचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. त्यावेळी सर्व मित्र परिवाराने वाढदिवस शुभेच्छा देत स्टेटस ठेवले होते.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात शुभम दत्तात्रय दिवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे राहणारा शुभम दिवेकर रात्रीच्या सुमारास मलठण फाटा येथे असलेल्या शुभम मिसळ येथे गेला होता. सदर ठिकाणी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक बसून अपघात झाला. दरम्यान, येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शुभम दत्तात्रय दिवेकर (वय २३ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. भांडगाव ता. दौंड जि. पुणे) याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवले; शेवटच्या जबाबात म्हटले...

याबाबत रवींद्र केशव शिवले (वय ३२ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहे.

हृदयद्रावक! चिमुकला चेडूंसारखा १५ फूट वर उडाला अन्...

शिक्रापूर येथील अपघातात मृत्यू झालेला शुभम दिवेकर याचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. त्यावेळी सर्व मित्र परिवाराने वाढदिवस शुभेच्छा देत स्टेटस ठेवले होते. मात्र, दोनच दिवसात मित्रांना शुभमच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवण्याची वेळ आली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune nagar highway accident news youth dead at shikrapur and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे