विजयस्तंभास मानवंदना देऊन जाणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू...

शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहेत.

पुणे : एक जानेवारी रोजी शौर्यदिनी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजय स्तंभास मानवंदना देऊन जाणाऱ्या एका दांपत्याच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये आरती सागर बोरगे ही महिला जागीच ठार झाली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

...म्हणून शिक्रापूर पोलिस चार दिवस झोपलेच नाहीत!

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ या ठिकाणी एक जानेवारी रोजी देशभरातून भीम सैनिक मानवंदना देण्यासाठी येत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथून सागर बोरगे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ सि यु ७४४३ या दुचाकीहून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजयस्तंभास मानवंदना देऊन पुन्हा पुणे-नगर महामार्गावरून पारनेर येथे जात असताना कोंढापुरी जवळ सागर बोरगे यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाचा जोरात धक्का लागला. यावेळी दुचाकीवरील सागर व त्यांची पत्नी आरती दोघे रस्त्यावर पडले. आरती यांच्या डोक्याला तसेच हातापायाला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये आरती सागर बोरगे (वय १९ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. 

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

धक्कादायक! पुणे शहरात वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱयाची आत्महत्या

याबाबत सागर भगवान बोरगे (वय २९ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहेत.

धक्कादायक! पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; कशी ती पाहा...

Title: pune nagar highway accident news women killed at kondhapuri
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे