ओळख! गालावर तीळ, काळे केस असे वर्णन आहे...

शिक्रापूर पोलिसांनी सदर युवकाबाबत माहिती घेतली असता काहीही माहिती मिळू शकली नाही.

पुणे: सणसवाडी (ता. शिरुर) येथे क्वालिटी मिसळ हॉटेलच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बापरे! वडिलांनी शाळेच्या ग्रुपवर अपलोड केले अश्लिल व्हिडिओ अन्...

सणसवाडी येथील क्वालिटी मिसळ हॉटेलच्या समोर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक युवक रस्ता ओलांडत होता. अहमदनगर बाजूने पुणेकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची सदर युवकाला धडक बसली. यावेळी सदर युवक जखमी होऊन रस्त्याचे कडेला पडला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. उपचारापूर्वी डॉक्टरांनी सदर युवकाला मृत घोषित केले.

बापरे! मेव्हणीसोबत लग्न करण्यासाठी चार मुलींचा घेतला जीव...

दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी सदर युवकाबाबत माहिती घेतली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत योगेश लीलाकांत बधे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले. मयत युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची प्यांट तसेच उजव्या गालावर तीळ, काळे केस असे वर्णन आहे. या युवकाबाबत कोणास काही माहिती शिक्रापूर पोलिसांशी ९६६५५८४८३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोल्सिंनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहेत.

धक्कादायक! सख्ख्या तीन बहिणींसह सात मुलींचा बुडून मृत्यू...

बापरे! कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह अन् चिमुकल्याचा भूकेने तडफडून मृत्यू...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune nagar highway accident near sanaswadi one dead and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे