सिंहगड किल्ल्यावर चोरी करणारे जेरबंद; पाहा नावे...

सिंहगडावर कचरा प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या मशिनरी चोरीची घटना 22/12/2022 रोजी घडली होती.

पुणेः सिंहगड किल्ल्यावरील कचरा विल्हेवाट लावण्याचे प्रकल्पाचे सुमारे 7,50,000/- रु किमतीचे साहित्याची चोरी करणाऱया चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सिंहगडावर कचरा प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या मशिनरी चोरीची घटना 22/12/2022 रोजी घडली होती. सदर बाबत हवेली पोलिस स्टेशन ला गु.र.नं 291/2022 भा.द.वी 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा अज्ञात चोरट्यांनी केला होता. सदर ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आणि चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली याची माहिती वनविभागाला नसल्यामुळे नेमका चोरीचा प्रकार कोणत्या दिवशी झाला याचा शोध घेऊन चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना तातडीने एकत्रित तपास करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलिस यांचे पथक सलग पंधरा दिवस याचा तपास करत होते. सिंहगडावर जाणाऱ्या खेडशिवापूर व डोणजे या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे 5 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर एक संशयित छोटा हत्ती टेम्पो गाडी तपास पथकाला आढळून आला होता. त्यानुसार सिंहगडावर काम करणारच या सर्व चोरीचा सूत्रधार निघाला. त्या प्रमाणे 
1) सुनिल शिवाजी चव्हाण (वय 23 रा.मोरदरी ता. हवेली), 
2) आकाश काळुराम चव्हाण (वय 25, रा. मोरदरी, ता. हवेली),
3) दादा बबन चव्हाण (वय 36, रा. शिंदेवाडी ता. भोर), 
4) शुभम रोहिदास भंडलकर (वय 23 रा. माहुर ता. पुरंदर),
5) शंभु दत्तात्रय शितकल (वय 22, माहुर ता. पुरंदर) 
6) सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय 30, रा. गुजर निंबाळकवाडी, ता हवेली, भंगार व्यावसायिक) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधीकारी भाऊसाहेब ढोले-पाटील यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पो नि सदाशिव शेलार हवेली पो स्टे, सपोनि नेताजी गंधारे, पो. हवा. अजित भुजबळ, पो. हवा.राजू मोमीन, पो. ना. अमोल शेडगे, पो.ना.बाळासाहेब खडके, पो.कॉ.मंगेश भगत, पो.कॉ.दगडू वीरकर, हवेली पो स्टे कडील सपोनि निरंजन रणवरे, पो ना गणेश धनवे, पो ना राजू मुंढे, पो ना भापकर, पो कॉ रजनीकांत खंडाळे यांनी केली आहे.

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune lcb team and haveli police six arrest for sinhagad fort
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे