Video: पोलिसकाकांनी गणेश विसर्जनादरम्यान मनसोक्त केला डान्स...

पुणे पोलिसांनी सर्व आपली जबाबदारी पार पडल्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी मनसोक्त गाण्यावर डान्स करून उत्साह साजरा केला.

पुणे : गणपती उत्सवामध्ये तब्बल 36 तास जनसेवेचे काम केल्यानंतर एक मनमोकळा श्वास घेऊन पुणे पोलिसांनी सर्व आपली जबाबदारी पार पडल्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी मनसोक्त गाण्यावर डान्स करून उत्साह साजरा केला. सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी मनसोक्त नाचताना व आपला ताण तणाव बाजूला ठेवून सामान्य लोकांबरोबर नाचतानाचे दृश्य पाहून नागरिकांनीही जल्लोष केला.

सार्वजनिक गणपती टिळक रोड मार्गे येणाऱया गणपती मंडळाची सांगता शनिवारी (ता. १०) दुपारी २ वाजता नवीपेठ , गांजवे चौक येथे झाली. शेवटच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलिसकाकांना गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलिसकाकांचा २२/२३ तास ड्युटी केल्याचा शीण निघून गेला.

पुणे शहरात मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांमुळे मिरवणूका शांततेत पार पडल्या. पोलिस मिरवणुकीत सहभागी झाले असले तरी सुरक्षिततेच्या बाबतीतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांनी ठेका धरत गणेशाला निरोप दिला आहे. पोलिसकाकांनी थेट मिरवणुकीत सहभागी होत गाण्यांवर ठेका धरल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे मिरवणुकीतील नृत्य कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे. 

​(Video: संदिप कद्रे, महेश बुलाख - पोलिसकाका)

Video: पुणे शहरातील स्वारगेट पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान धरला ठेका...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रुग्णवाहिकेला दिला रस्ता मोकळा करून...

माणूस उभा आहे वर्दीतला; म्हणून सणसाजरा होतोय गर्दीतला...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune ganeshotsav 2022 pune police dance at ganeshotsav video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे