पुण्यातील माजी नगरसेवकाने बदला घेण्यासाठी दिली सुपारी; पण...

दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे आढळली. शिवाय, त्यांच्याकडे सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम देखील आढळली आहे.

पुणे : चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूकीत गोळीबार केल्याचा राग मनात धरून आरोपीचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगरांना हत्येची सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील माजी नगरसेवकासह चार जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

राज कुंद्राच्या गुन्हेगारी प्रकरणांची पाहा यादी...

पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तसेच आरोपींकडून सव्वा लाख रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. राजन जॉन राजमणी (वय 38, भाग्योदय नगर, कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, काळा खडक, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक विवेक यादव विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस आरोपींचे जबाब नोंदवून घेत आहेत.

मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत झाली पुन्हा वाढ...

आरोपी राजन राजमणी आणि त्याचा मित्र इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. शहरात अनेक पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. संबंधित दोघेही काही दिवसांपूर्वी कोविडची रजा घेऊन येरवडा कारागृहाबाहेर आले आहेत. दरम्यान, दोघांनी कोणाच्या तरी हत्येची सुपारी घेतली असून, त्यांच्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजन राजमणी आणि इब्राहिमला लुल्लानगर परिसरातून अटक केली.

हनिमूनदरम्यान नवऱयाकडून घडली धक्कादायक घटना...

अटक केल्यानंतर दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे आढळली. शिवाय, त्यांच्याकडे सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम देखील आढळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, पुण्यातील कँटोन्मेट बोर्डाच्या माजी नगरसेवकाने हत्येची सुपारी दिल्याचं कबुल केले आहे. बबलू गवळी नावाच्या युवकाने चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर गोळीबार केला होता. हा बदला घेण्यासाठी नगरसेवक यादव यानं बबलू गवळी याची सुपारी दिली होती.

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune former corporator give contract of murder of babalu gaw
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे