'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा' असा मेसेज आला तर...

कोणत्याही मेसेज अथवा फोन ला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन देखील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

पुणे: अलीकडील काळामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना मोबाईलचे सिम कार्ड बंद होणार असल्याची भीती नागरिकांना दाखवून फसवणूक होत आहे. नागरिकांनी 'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा', अशा मेसेज ला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

युवकाने दिवंगत वडिलांचे लाखो रुपये ऑनलाईनमध्ये गमावले...

नागरिकांमध्ये मोबाईलचे प्रमाण वाढलेले असताना नागरिकांच्या मोबाईल वर मेसेज अथवा फोन करुन तुमचे सिम कार्ड ब्लॉक झाले आहे त्याची केवाय सी करायची असे सांगून फसवणूक केली जात आहे, अशा वेळी नागरिकांना १० रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगून नंतर नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने गायब केली जात आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी अशा पद्धतीच्या कोणत्याही मेसेज अथवा फोन ला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन देखील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्न करायचे आहे; असे म्हणाली अन्...

Video: सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात अन्...

मी तुझ्या आत्याचा मुलगा बोलत आहे, असे म्हणाला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district rural police suprident dr abhinav deshmukh mob
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे