पुणे जिल्ह्यातील महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

पुजा यांच्या मागे पती, दीप (वय 8), ८ महिन्यांचे बाळ, सासू-सासरे असा परिवार आहे. पूजा यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पुणे : दौड पोलिस ठाण्यात पोलिस काँस्टेबल असलेल्या महिलेने धनकवडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा अमोल सकपाळ ऊर्फ कांबळे (वय २८, रा. तळजाई कॉल्नी, प्रियदर्शनी शाळेसमोर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. 

धक्कादायक! पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

पुजा यांच्या मागे पती, दीप (वय 8), ८ महिन्यांचे बाळ, सासू-सासरे असा परिवार आहे. पूजा यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घरगुती कारणावरुन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रेमप्रकरणातून महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा सकपाळ दौंड पोलिस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या सुट्टीवर धनकवडी येथे आल्या होत्या. धनकवडी मध्ये त्यांचे तीन मजली घर आहे. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. रविवारी (ता. 5) रात्री उशिरा त्यांनी दुसऱ्या मजल्यावर घरात ओढणीच्या साह्याने आत्महत्या केली. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या दुसर्‍या मजल्यावरील रूममध्ये गेल्या. त्या परत खाली न आल्याने त्यांचे पती वर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. पूजा यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले. आत काही दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पूजा यांना भारती हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district police news lady constable suicide at dhankawa
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे