कार खरेदीच्या बहाण्याने युवकाची फसवणूक...

बँकेतून मंजूर झालेले कर्ज कमी पडत असल्याने सोहेल याने उर्वरित रक्कम देखील पुन्हा शशिकुमार याचे बँक खात्यामध्ये जमा केली.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) येथील युवकाला कार खरेदी करून देतो असे म्हणून मुंबईतील एकाने गंडा घातल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे शशीकुमार टी राजुरा या युवकावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर येथील सोहेल शेख या युवकाला कार घ्यायची असल्याने त्याने पुणे येथील शोरूम मध्ये कार बाबत चौकशी केली. मात्र, कार तीन महिने नंतर भेटणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सोहेलच्या एका मित्राच्या ओळखीने त्याचा संपर्क मुंबई येथील शशीकुमार टी राजुरा नावाच्या युवकाशी झाला. त्याने सांगितलेली किंमत कमी असल्याने सोहेल याने १० मार्च २०२१ रोजी शशीकुमार च्या बँक खात्यावर काही पैसे पाठवले. त्यांनतर लगेचच कार घेण्यासाठी बँक लोन करून घेतले. मात्र, यावेळी बँकेतून मंजूर झालेले कर्ज कमी पडत असल्याने सोहेल याने उर्वरित रक्कम देखील पुन्हा शशिकुमार याचे बँक खात्यामध्ये जमा केली. सोहेल कडून शशिकुमार याला ऐकून २ लाख २५ हजार नऊशे रुपये देण्यात आलेले होते. त्यांनतर कार आणण्यासाठी देखील सोहेल व त्याचे काही नातेवाईक मुंबई येथे गेले. मात्र, शशिकुमार त्यांना भेटलाच नाही.

शशीकुमार याला वारंवार कार बाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे सोहेल याने त्याला कार घेण्याचे रद्द करत असल्याचे सांगून पैसे परत मागितले. मात्र, शशिकुमार याने काही पैसे परत पाठवले. मात्र, १ लाख ९२ हजार रुपये परत दिलेच नाहीत. त्यांनतर देखील सोहेल यास वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सोहेल इलियास शेख (वय २५ वर्षे रा. करंजे कॉम्प्लेक्स शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी शशीकुमार टी राजुरा (रा. सीताराम निवास सेक्टर ९ नवी मुंबई) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल दांडगे हे करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district cyber crime news youth register complaint car
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे