SVS Aqua कंपनीच्या मालकाला अटक; अहवालात म्हटले की...

प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणेः मुळशी तालुक्यात असलेल्या पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायानिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाला असून, पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

SVS Aqua: पत्नीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण...

दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे.

Pune Fire : प्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

SVS Aqua कंपनीत मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे आली समोर...

प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत मंदा भाऊसाहेब कुलट (वय ४५), संगीता उल्हास गोंदे (वय ३६), गीता भारत दिवारकर (वय ३८), त्रिशला संभाजी जाधव (वय ३३,सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय ४५, रा. करमोळी, ता. मुळशी), सुनिता राहुल साठे (वय २८, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय २३, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय ३७, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय २२) संगीता अप्पा पोळेकर (वय ४२), महादेवी संजय आंबारे (वय ३५, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (३३), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय ३०), सचिन मदन घोडके (वय २५) यांचा मृत्यू झाला.

अहवालात काय म्हटलं आहे?
उरवडे आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी रिपोर्ट जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. बेकायदा अतिरिक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे, कर्मचाऱ्यांच्या ईएसआयएस अंतर्गत नोंदी नसणे, फायर सेफ्टी नियम अर्थात अग्निसुरक्षा शर्थींच उल्लंघन करण्यात आल्याचं अहवालात म्हटले आहे. यासोबतच 2016 ते 2020 प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय रासायनिक प्रक्रिया उद्योग चालवणे, पीएमआरडीएच्या परवानगी शिवाय कंपनीच्या मूळ बांधकामात बदल केल्याचंही म्हटलं आहे.

आगीत मृत्यू होण्याची कारणे
अहवालात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना स्वयंचलित दरवाजा स्फोटाच्या प्रेशरने बंद झाल्यानंतर बाहेर पडणे अशक्य झाल्याने कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crimen news svs aqua company fire case police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे