मोबाईलवर चित्रीकरण केले म्हणून खल्लास करण्याची धमकी....
मोबाईलवर चित्रिकरण केल्यामुळे युवकासह त्याच्या आई वडिलांना बेदम मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली.पुणेः मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे भावकीच्या जमिनीच्या वादातून एका कुटुंबियांचे असलेले पत्राशेड उध्वस्त करण्यात आले. याबाबतचे मोबाईलवर चित्रिकरण केल्यामुळे युवकासह त्याच्या आई वडिलांना बेदम मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कैलास महादू मिडगुले, विठ्ठल नवनाथ मिडगुले, बाळू शिवराम मिडगुले, साहेबराव सखाराम मिडगुले, गणेश गंगाराम मिडगुले, अविनाश फक्कड मिडगुले, बाजीराव गणपत मिडगुले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धक्कादायक! सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळले...
मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे तुषार मिडगुले यांच्या वडिलांनी उभारलेले जुने पत्र्याचे शेड आहे. सकाळच्या सुमारास मिडगुले यांच्या भावकीतील कैलास मिडगुले यांसह काही जण तेथे आले त्यांनी सदर पत्रा शेड काढून टाकण्यास सुरवात केली. यावेळी सदर व्यक्ती करत असलेल्या कृत्याची तुषार मिडगुले याने त्याच्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. तुषार याने चित्रीकरण केल्याने आलेल्या व्यक्तींनी त्याचा मोबाईल हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत त्याला मारहाण केली. तुषारचे आई वडील त्याला सोडविण्यासाठी आले असता मारहाण करणाऱ्यांनी त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून खल्लास करून टाकण्याची धमकी दिली.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई
याबाबत तुषार मारुती मिडगुले (वय २६ वर्षे रा. रा. मिडगुलवाडी ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी कैलास महादू मिडगुले, विठ्ठल नवनाथ मिडगुले, बाळू शिवराम मिडगुले, साहेबराव सखाराम मिडगुले, गणेश गंगाराम मिडगुले, अविनाश फक्कड मिडगुले, बाजीराव गणपत मिडगुले (सर्व रा. मिडगुलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश सुतार हे करत आहेत.
थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...