महिलेचे वेगवेगळे व्हिडिओ काढून घेतले अन्...

महिलेला मोबाईल मधील व्हिडिओ दाखवून महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

पुणे: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला वारंवार धमकी देऊन महिलेवर बलात्कार करून महिलेला मारहाण करत महिलेला धमकी देऊन अश्लील फोटो व व्हिडिओ विकून टाकण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश वामन सोनवणे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा येथील महिलेशी एका कामातून ओळख झाल्यानंतर गणेश हा वेळोवेळी महिलेच्या घरी येत होता. दरम्यान त्याने महिलेचे वेगवेगळे व्हिडिओ काढून घेतले त्यांनतर महिलेला ते दाखवून महिलेला मोबाईल मधील व्हिडिओ दाखवून महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यावेळीं देखील त्याने वारंवार याबाबत चित्रीकरण करुन ठेवले. दरम्यान याबाबत तू कोणालाही काही सांगितले तर मी हे सर्व फोटो व व्हिडिओ इंटरनेट वर टाकेल तसेच कोणाला विकून टाकेल अशी धमकी देत वारंवार महिलेवर अत्याचार केला, त्यांनतर महिलेने नकार दिला असता त्याने महिलेला मारहाण करून धमकी दिली. 

मात्र, याबाबत असह्य झाल्याने महिलेने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश वामन सोनवणे (रा. वाजेवाडी ता. शिरूर जि. पुणे सध्या रा. कटकेवस्ती वाघोली ता. हवेली जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली. 

गणेश सोनवणे याला अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.

Title: Pune district crime news women tourcher at Koregaon bhima
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे