महिला पोलिस कर्मचाऱयाची गळफास घेऊन आत्महत्या...

दिपाली यांचे नुकतेच लग्न ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता. 16 नोव्हेंबर विवाह होणार होता.

पुणे : देलवडी (ता. दौंड) येथे पालघर येथील पोलिस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपाली बापुराव कदम (वय 26, सध्या रा. लोकरी माणिकपूर वसई मुंबई )असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

पुणे जिल्ह्यातील महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

दिपाली यांनी गळफास घेण्यापूर्वी भाऊ रोहित याला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर मुंबई) यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलिस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली. अहिरे हा वारंवार ओळखीचा गैरफायदा घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दिपाली यांचे नुकतेच लग्न ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता. 16 नोव्हेंबर विवाह होणार होता.

प्रेमप्रकरणातून महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण अन्...

साखरपुडा व लग्नामुळे दिपाली सध्या मूळ गाव देलवडी (ता. दौंड) येथे होती. लग्न जमल्याची माहिती अहिरे यांना समजताच त्यांनी नवरदेवाच्या वडिलांना फोन करून दिपाली संदर्भात माहिती दिली. वाल्मीक आहिरे याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास दिपाली चा भाऊ रोहित याला फोन करून धमकी दिली.

धक्कादायक! पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

सर्व कुटुंबीयांनी दिपाली हिस समजावून सांगितले. बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन दीपालीने आत्महत्या केली. यासंदर्भात दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news women police suicide at daund regis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे